अजित पवारांकडून जामखेडच्या जनतेची उपेक्षा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- तत्कालिन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्याकडून कुकडीच्या पाण्यासंदर्भात जामखेड तालुक्यातील जनतेची कायम उपेक्षा झाली. कुकडीचे पाणी जामखेड तालुक्याला देण्याची मागणी केल्यास अजित पवार यांच्याकडून ' राष्ट्रवादीचा आमदार निवडून द्या पाणी देतो ' अशा अटी घातल्या जात होत्या. 
Loading...

१८ वर्षांपूर्वी तत्कालिन आ. सदाशिव लोखंडे यांनी अजित पवार यांना कुकडीचे पाणी देण्याची मागणी केली असता , पवार यांनी ' कुकडी प्रकल्पातील पाण्याचे नियोजन झाले असल्याने जामखेड तालुक्याला पाणी देता येणार नसल्याचे स्पष्ट उत्तर २७ जानेवारी २००१ रोजीच्या पत्राव्दारे कळविले होते. 


त्यानंतर २९ जुलै २००९ रोजी जामखेड तालुक्यातील शिष्टमंडळाने माजी सभापती दिवंगत डॉ. पी. जी. गदादे, मन्सूरभाई सय्यद व भानुदास बोराटे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे अजित पवार यांची याप्रश्री भेट घेतली असता, पवार यांनी पक्षाचा आमदार द्या पाणी देतो, असे उत्तर दिले होते. 


नंतर जिल्हा परिषद ,पंचायत समितीच्या निवडणुकीत १ फेब्रुवारी २०१२ रोजी जामखेड येथे प्रचाराच्या सभेत ' पक्षाचे उमेदवार निवडून द्या, पाणी देतो' अशी अट मतदारांना घातली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार जामखेड तालुक्यातील जनतेने निवडून दिले होते. परंतू पाणी देण्याचा निर्णय अजित पवार यांनी केला नाही.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.