मोबाईल विक्रेत्यावर शस्राने वार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- रात्रीच्या सुमारास दुकान बंद करून घरी जात असताना शिर्डीतील मोबाईल दुकानदार व त्यांच्या वडिलांच्या दुचाकीस गाडी आडवी घालून मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी हातातील बॅग हिसकविण्याचा प्रयत्न केला. त्यास विरोध केल्याने चोरट्यांनी धारदार शस्राने वार करून गंभीर जखमी करत गळ्यातील साडेतीन तोळ्यांची ७० हजार रुपयांची गळ्यातील चेन ओरबाडून पोबारा केला. 
Loading...

दोघांनी आरडाओरडा केल्याने हातातील पैशांची बॅग वाचली.सुजित जैन याने शिर्डी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे,की नगरपंचायतच्या व्यापारी संकुलात आपले मोबाईलचे दुकान असून मी आणि माझे वडील जितेंद्र पन्नालाल जैन (वय ५६, रा. ५२ बंगले, शिवाजीनगर) रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास आमचे मोबाईल शॅपीचे दुकान बंद करून दिवसभराचा गल्ला घेऊन स्कुटीवरून (नं. एमएच १७ ए एच ०५३४) वडील चालवीत होते व मी पाठीमागे बसलो होतो. 


कनकुरी रोडवरून तोंडाला रुमाल बांधलेल्या अज्ञात तीघा जणांनी आमच्या गाडीला ओव्हरटेक करून त्यांची डिस्कवर गाडी आडवी लावली. दोघांनी खाली उतरून वडिलांच्या गळ्यातील सोन्याची चेन बळजबरीने हिसकावून घेत असताना पन्नालाल जैन यांनी प्रतिकार केला असता दोघा इसमांकडे असलेल्या चाकूसारख्या धारदार शस्राने त्यांच्या हातावर व गालावर वार करून गंभीर जखमी केले. 


यावेळी त्यांना सोडवण्यासाठी गेलो असता माझ्या जवळील पैशाची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी मी जोरजोराने ओरडा ओरड केल्याने त्यांनी त्यांच्याजवळ असलेली मोटरसायकल घेऊन पळ काढला. याबाबत शिर्डी पोलिसात गु.र.नं. २००/२०१८ प्रमाणे भा.दं.वि. कलम ३९४, ३४ प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे करीत आहे.

----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.