कर्जत तालुका अतिसंवेदनशील म्हणून घोषित.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्ह्यात कर्जत तालुका सेन्सेटिव्ह तालुका म्हणून घोषित केला आहे. त्याची ओळख बदलण्याचे काम आपल्या सर्वांना मिळून एकत्रित करावे लागणार आहे. असे प्रतिपादन अर्चना नष्टे यांनी व्यक्त केले. 

Loading...
कर्जत पोलिस स्टेशन हद्दीत आगामी गणेशोत्सव व मोहरम सणानिमित्त दादा पाटील महाविद्यालयातील एपीजे अब्दुल कलाम सभागृहात शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी श्रीमती अर्चना नष्टे या होत्या. 

प्रथमत: तहसीलदार किरण सावंत यांनी प्रस्ताविक करताना सोशल मीडियाचा वापर नकारात्मक लवकर होतो. त्यामुळे धार्मिक उत्सव आनंदात साजरे करण्यासाठी सर्वानी विशेष लक्ष देणे आवशक आहे. गणेश मंडळानी आपल्या दोन तीन कार्यकर्त्यांची कायम नियुक्ती करावी. 

शहरातील मोकाट जनावरांपासून धोका होणार नाही याची काळजी घ्यावी. रस्त्याला अडचण होणार नाही असे मंडप टाका. या धार्मिक मंडपात अवैध प्रकार टाळा, सीसीटीव्ही लावावा, गावागावात एक गाव एक गणपती राबविण्यासाठी विशेष प्रयत्न करा. मतदार जागृती अभियान, बेटी बचाव बेटी पढाव असे अभियान राबवण्याचे आवाहन केले.

जिल्ह्यात कर्जत तालुका सेन्सेटिव्ह तालुका म्हणून घोषित केल्याचे सांगून सर्वाना धक्काच दिला. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असलेल्या मंडळांनाच वर्गणी गोळा करता येईल. इतरांनी केलेली वर्गणी अनधिकृत असेल असे सांगीतले. यावेळी तालुक्यात एक गाव एक गणपती ही चळवळ वाढावी. यासाठी प्रशासनाने उद्दिष्ट ठेऊन जबाबदार व्यक्तीकडे जबाबदारी सोपवून यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत आशिष बोरा यांनी व्यक्त केले. 

तर राहुल नवले, नीलेश दिवटे, ईश्वर तोरडमल, रवींद्र दंडे, यांचे सह उप विभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नष्टे यांनी तालुका संवेदनशील नाही हे आपल्याला दाखवून द्यावे लागेल. गणेश स्थापनेनंतर मूर्तीपुढे पैसे वाहण्याऐवजी एक वही व एक पेन वाहण्याचे आवाहन केले.किरण पाटील यांनी आभार मानले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.