डाळिंबाला ७५०० रुपये भाव, शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव येथील बाजार समितीत शनिवारी ३१ ऑगस्‍ट रोजी झालेल्‍या डाळींब लिलावात डाळींब नं. एकला ७५०० प्रति क्विंटल ( प्रति किलो ७५ रुपये) भाव निघाल्‍याने गत सोमवारच्‍या लिलावापेक्षा १५०० रुपये प्रति क्विंटल ( प्रति किलो १५ रुपये) उच्‍चांकी भावाने विकला गेला,अशी माहिती बाजार समिती सभापती संभाजी रक्‍ताटे यांनी दिली.


Loading...
कोपरगाव बाजार समितीत शनिवारी ४८२४ कॅरेट डाळींब आवक झाली होती. बाजार समितीच्‍या आवारात शनिवारी,दि. ३१ ऑगस्‍ट रोजी सकाळी ९ वाजता लिलाव सुरू झाला. त्‍यावेळी डाळींब नं. १ - ५००० ते ७५००, नं. २- ३००० ते ५००० , नं. ३- २५०० ते २७५० रुपये क्विंटल भावाने विकला गेला. शेतकऱ्यांनी २० किलो कॅरेटमधुन डाळींब आणल्‍याने प्रति कॅरेट १५०० रुपये तर प्रति किलो ७५ रुपये भाव निघाला. गत सोमवारच्‍या तुलनेत आवक ६६३ कॅरेटने घटली असली तरी भावाने प्रति क्विंटल १५०० रूपयांनी उसळी मारली आहे. 

त्‍यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे,असेही सभापती संभाजी रक्‍ताटे म्‍हणाले. . शेतकऱ्यांना आवाहन करताना उपसभापती राजेंद्र निकोले म्‍हणाले, आपली शेतीमाल आपल्‍याच बाजार समितीत आणल्‍याने शेतकऱ्यांचा वहातुक खर्चाची बचत होते. विशेष म्‍हणजे अधिकृत मापाड्यामार्फत चोख व त्‍वरीत वजनकाटा, अधिकाऱ्यामार्फत लिलाव, योग्‍य भाव, रोख पेमेंट आदी सुविधा पुरविण्यात येत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.