कारचालकाला अडवून ५५ हजारांची रोकड व ५ हजारांचा मोबाइल लांबवला


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पुणे येथील कारचालकाला अडवून ५५ हजारांची रोकड व ५ हजारांचा मोबाइल लांबवण्यात आला. धामोरीफाट्याजवळ मंगळवारी पहाटे ५ च्या सुमारास ही घटना घडली. 


Loading...
पांडुरंग काळे (कोर्टरोड, पुणे) हे कारमधून नगरच्या दिशेने जात असताना काळ्या रंगाच्या पल्सरवर आलेल्या तिघांनी मोटरसायकल आडवी घालून त्यांना थांबवले. कोयता व चाकूचा धाक दाखवून काळे यांच्याजवळील ५५ हजारांची रोकड व मोबाइल हिसकावत भामट्यांनी पोबारा केला. मनमाड रस्त्यावर धामोरी फाट्याजवळ रस्तालुटीच्या अशा घटना वारंवार घडत आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.