शनि शिंगणापूरमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यास लुटले


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शनि शिंगणापुर रस्त्यावरुन महावितरण कंपनीतील कर्मचारी पांडुरंग तुकाराम तेलोरे हे घरी जात असताना चालेलेल्या दोघांनी त्यांना रस्त्यात अडवून गळ्याला तलवार व चाकु लावुन सोन्याची अंगठी लूटल्याची घटना काल रात्री घडली.


Loading...
पांडुरंग तुकाराम तेलोरे, रा. ब्राम्हणी हे महावितरणमधील कर्मचारी राहुरी खुर्द येथील सबस्टेशन येथे काम करण्यासाठी १३२ के.व्हि.ला रात्री ११वाजता येत असताना राहुरी-सोनई रस्त्यावर गोटुंबे आखाडा (तमनर आखाडा फाटा) येथे आले असता पाठीमागुन अचानक पांढऱ्या रंगाच्या मारुती ८०० या चारचाकी वाहनातुन तोंड बांधुन आलेल्या दोघांनी तेलोरे यांना गाडी आडवी लावुन त्यांच्या गळ्याला तलवार व चाकु लावुन धमकी देत त्यांच्या अंगाची झडती घेतली. 

तेलोरे यांच्या खिशातुन रोख रक्कम न मिळाल्याने भामट्यांनी त्यांच्या उजव्या बोटातील सुमारे सात ग्रॅम सोन्याची अंगठी काढुन घेत चोरटे चारचाकी वाहनातुन राहुरीच्या दिशाने फरार झाले. घाबरलेल्या अवस्थेत तेलोरे यांनी ब्राम्हणी येथे घरी जाणे पसंत केले. आज सकाळी राहुरी पोलिसात येवून तेलोरे यांनी पोलिसांना सदर घटना सांगितली असता पोलिसांनी त्या घटनेची तक्रार नोंदवून घेतली.पोलीस निरीक्षक अरविंद शिळीमकर पुढील तपास करीत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.