विवाहितेचा शाररीक, मानसिक छळ करून विनयभंग,तीन वर्ष कारावासाची शिक्षा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विवाहितेचा शाररीक, मानसिक छळ करून विनयभंग केल्याच्या आरोपावरून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती तृप्ती नाईक-देशमुख यांनी पती अमोल देवराम गुंड, दीर अभिजीत देवराम गुंड, सासू सविता देवराम गुंड, सासरा देवराम दत्तात्रय गुंड (सर्व रा. गुलमोहर रोड, अ. नगर) यांना दोषी धरून प्रत्येकी तीन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. सौ. अर्चना सुभाष चव्हाण-थोरात यांनी काम पाहिले. या खटल्याची माहिती अशी की, पिडीत फिर्यादीचा विवाह अमोल यांच्याशी झाला होता. ती सासरी नांदत असताना तिने मुलाला संभाळण्यासाठी वडिलांकडून दरमहा पाच हजार रुपये आणावेत तसेच कंपनीत नवीन मशिनरी घेण्यासाठी १० लाख रुपये आणावेत या कारणावरून पती, सासू, सासरा व दीर वेळोवेळी त्रास देऊन शाररीक व मानसिक छळ करीत होते. 


Loading...
तसेच सासरे व दीर यांनी वेळोवेळी तिचा विनयभंग केला. त्यामुळे तीने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास सपोनि. ए. टी. चिंतले यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात पाठविले. या खटल्याची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती तृप्ती नाईक-देशमुख यांचेसमोर झाली. 

यावेळी सरकारपक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले तर बचाव पक्षातर्फे दोन साक्षीदार तपासले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकूण न्यायालयाने चौघांना दोषी धरून प्रत्येकी तीन वर्षे कारावास व पंधरा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आठ महिने कारावासाची शिक्षा तसेच प्रत्येक एक वर्षे कारावास व पंधरा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आठ महिने कारावास. 


तसेच आरोपी सासू सविता गुंड सहा महिने कारावास व पाच हजार रुपये दंड, आरोपी अभिजीत गुंड यास भादवि ५०६ नुसार सहा महिने कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम एक लाख तीस हजार रुपये पैकी एक लाख दहा हजार रुपये पिडीतेस नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश केला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.