नगरमधील निवृत्त अधिकाऱ्याची पाच लाखांची फसवणूक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पुणे येथील आर कॅबमध्ये असलेल्या कंपनीत गुंतवणूक करून त्याचा मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून नगरमधील निवृत्त अधिकाऱ्याची पाच लाख 18 हजार 100 रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. निवृत्त अधिकारी जयंत पंडितराव जोशी (वय 59, रा. सावेडी) यांची ही फसवणूक झाली आहे. न्यायालयात दाद मागितल्यानंतर तोफखाना पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. धीरज भारत पुणेकर व समीर अल्पे (दोघे रा. पुणे) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुणे येथील आर कॅबमधील कंपनीत पुणेकर आणि अल्पे या दोघांच्या सांगण्यावरून जोशी यांनी गुंतवणूक केली होती. 


Loading...
त्यासाठी या तिघांची नगरमध्ये एका हॉटेलमध्ये बैठक झाली होती. या बैठकीत पुणेकर व अल्पे याने एका वृत्तपत्रातील जाहिरात दाखवली होती. यावर विश्‍वास ठेवून जोशी यांनी पाच लाख 18 हजार 500 रुपयांची गुंतवणूक केली. परंतु ठरल्याप्रमाणे परतावा मिळाला नाही. जोशी यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तक्रार करण्यास सुरूवात केली. न्यायालयात धाव घेऊन तक्रार दाखल केली. न्यायालयाने त्यावर आदेश करत तोफखाना पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचा आदेश दिला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.