आंतरजातीय विवाह केल्याने पित्याने तोडले मुलीचे हात.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- हैदराबाद शहरात अनुसूचित जातीच्या जावयाची अत्यंत क्रूरपणे हल्ला करण्यात आला आहे.खोट्या प्रतिष्ठेपायी एका सासऱ्याने आपल्या जावयावर आणि स्वत:च्या मुलीवर भररस्त्यात हल्ला केला आहे. मुलीने एका अनुसूचित जातीच्या तरुणाशी लग्न केले, इतकीच तिची चूक होती.

२२ वर्षीय माधवी आणि २२ वर्षीय बी. संदीप हे पाच वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते आणि नंतर १२ सप्टेंबरला त्या दोघांनी लग्न केले. मुलीचे वडील मनोहर शेट्टी यामुळे नाराज झाले होते. त्यांनी नाटक करून आपल्या मुलीला आणि जावयाला भेटण्यासाठी बोलावले आणि याचवेळी शेट्टींनी एका कोयत्याने संदीपवर वार केला.
Loading...

जेव्हा मुलगी माधवी आडवी आली तेव्हा तिच्यावरही हल्ला केला. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला असून यात वडील आपल्या मुलीवर आणि जावयावर हल्ला करताना दिसतात.

याबाबत पोलीस उपायुक्त विजयकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेट्टींनी संदीपला फोन केला आणि आपल्या मुलीची आठवण येत असल्याने घेऊन येण्यास सांगितले. त्याने त्या दोघांना एसआर नगरातील एका ऑटोमोबाईलच्या शोरूमजवळ बोलावले.तिथे त्यांच्यावर एका धारदार कोयत्याने हल्ला केला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.