राहुरी - अवैध वाळूउपसा बंद करण्याची मागणी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्यातील चांदेगाव येथील नदीपात्रातून होत असलेला अवैध वाळूउपसा बंद करावा, या मागणीचे निवेदन छावा संघटनेच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले.


Loading...
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात छावाचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र बोलकर यांनी म्हटले, की वाळूउपशामुळे नदीकाठची शेती उद्ध्वस्त झाली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. शासनाने जेथे वाळुचे लिलाव झालेले आहेत, त्या ठिकाणांहून वाळूउपसा करताना नियम डावलले जात आहेत. वाळूउपशामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. 

पाणी आल्यावर या खड्ड्यांमुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो. वाळूवाहतूक करणारे ट्रक वेगाने वाहन चालवतात, त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याविरोधात कुणी बोलण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना धमक्या दिल्या जातात. असे असुनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. 


यावर कारवाई केली गेली नाही, तर प्रांत कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष किशोर चव्हाण, प्रदेश अध्यक्ष विलास पांगरकर, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र बोलकर, जिल्हाध्यक्ष कैलास मापारे, तालुकाध्यक्ष प्रेम चव्हाण, सागर कडनोर, संजय सोमवंशी, दिपक लांडे, जालू करपे, संजय रुपटक्के, त्रिभूवन, रवी हरार, राहूल हरकल, नजीर सय्यद, योगेश व्यवहारे, निलेश व्यवहारे आदींनी दिला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.