शेतात मृतदेह सापडलेल्या व्यक्तीची हत्याच


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अकोले तालुक्यातील घाटघर येथे गुरुवारी तुकाराम महादु सोडणार या व्यक्तीचा शेतामध्ये चिखलात तोंड खुपसलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीमध्ये धारदार शस्राने वार करून हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार चंद्रसेन तुकाराम सोडणार यांनी गोविंद विठु सोडणार आणि विष्णु विठु सोडणार या दोघांविरोधात राजुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

Loading...

Loading...
अकोले तालुक्यातील घाटघर येथे तुकाराम सोडणार बुधवारी आपल्या शेतामध्ये गेले असता परत घरी परतलेच नव्हते. त्यांचा मृतदेह गावापासुन चार कि.मी. वरील पायदरा भागातील स्वत:च्याच शेतात चिखलात तोंड खुपसलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सोडणार हे कायम शेतामध्ये काम करण्यास जात असत. तर त्यांचा मुलगा चंद्रसेन हा बाहेरगावी काम करण्यास जात होता. 

एक वर्षापुवी तुकाराम सोडणार आणि गोविंद विठु सोडणार व विष्णु सोडणार यांच्यामध्ये चंद्रसेनच्या पत्नीवरुन वाद झाले होते. तेव्हा गोविंद आणि विष्णु यांनी तुकाराम व चंद्रसेन यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली होती. तीन महिन्यांपूर्वी हा वाद परत उफाळुन आला होता. तेव्हा गावामध्येच बैठक घेऊन वादावर पडदा टाकला गेला होता. . बुधवारी सकाळी तुकाराम सोडणार हे आपल्या शेतात काम करण्यास गेले असता परत न आल्याने त्यांच्या सुनेने शोधाशोध करण्यास सुरुवात केली. 

काही व्यक्तींना बरोबर घेत शेतात शोध घेतला असता तुकारामाचा मृतदेह आढळुन आला. सदरचे वृत्त राजुर पोलिस स्टेशनला कळविल्यानंतर तात्काळ पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत राजुरच्या ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठविला. त्यामध्ये तुकाराम यांची धारदार शस्त्राने हत्या केल्याचे निष्पन्न झाले.

मयताचा मुलगा चंद्रसेन सोडणार याने गोविंद विठु सोडणार आणि विष्णु विठु सोडणार या दोन व्यक्तिं विरुद्ध राजुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला असुन पो.नि. पी. वाय. कादरी यांच्यासह पो.कॉ. रविंद्र वाकचौरे आणि किशोर तळपे तपास करत आहेत. आरोपींना रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.