माझ्या राजकारणाचा समारोप भाजपमध्येच करणार - आमदार शिवाजी कर्डिले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राजकारणात आल्यापासून राजकीय परिस्थितीनुसार अनेक पक्ष बदलण्याची वेळ माझ्यावर आली. परंतु सर्वसामान्यांच्या पाठबळामुळे राजकारणात आतापर्यंत कधीही अपयश आले नाही. आता मात्र मी माझ्या राजकारणाचा समारोप भाजपमध्येच करणार आहे.दरम्यान अनेक पक्षाकडून लोकसभेसाठी ऑफर आल्याची कबुलीही आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. 
Loading...

राज्याच्या ग्रामविकासमंत्री ना.पंकजा मुंडे यांचे शुक्रवार दि.७ सप्टेंबर रोजी नगर जिल्ह्यात आगमन होत आहे. त्या राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील विविध विकासकामांच्या शुभारंभानिमित्त जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.या पार्श्वभूमीवर बुऱ्हाणनगर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. 


या बैठकीसाठी राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते हजर होते.यावेळी आ.कर्डिले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे,पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून राहुरी, नगर, पाथर्डी मतदार संघाला भरीव निधी मिळाला. ना. पंकजा मुंडे यांनी काँक्रिट बंधारे बांधण्यासाठी यापूर्वीच वीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे. 

त्याचबरोबर २५ - १५ मधून देखील जवळपास पंधरा कोटींचा निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री पेयजल योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी देखील मोठा निधी दिला आहे. या विविध विकासकामांचा शुभारंभ ना.पंकजा मुंडे यांच्या हस्ते शुक्रवार दि.७ सप्टेंबर रोजी पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र चिचोंडी येथे सकाळी दहा वाजता होणार असल्याचे आ.कर्डिले यांनी सांगितले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.