पहिले लग्न लपवून दुसरीला फसविले!


जळगाव : पहिले लग्न केल्याचे तसेच पाच वर्षाचे अपत्य असताना ही माहिती लपवून दुसरे लग्न करून माहेरून तीन लाखाची मागणी करून महिलेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह नऊ जणांविरूध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कौसर बी. रफिक उर्फ राजू (३७) उंदरी ता. चिखली ह.मु. बिसमिल्ला चौक तांबापूरा या महिलेशी रफिक उर्फ राजू याचा विवाह झाला आहे. रफिक याचे पहिले लग्न झाले असून त्याला पाच वर्षाचे अपत्य आहे. ही माहिती महिलेपासून लपवून तिच्याशी दुसरे लग्न केले. लग्नाच्या वेळी दहा हजाराचे दागीने दिले होते. 

Loading...
१८ फेब्रुवार ते १८ मे पर्यंत पतीसह सासरच्या मंडळीनी विवाहितेकडे व्यवसाय करण्यासाठी माहेरून तीन लाख रूपयांची मागणी करून तिचा मानसिक शारिरीक छळ केला. पतीसह सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून विवाहितेने एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठुन कैफियत मांडली. 

याप्रकरणी कौसर बी. रफिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रफिक उर्फ राजू शेख, रजीया बी.शेख, सुंदर बी. शेख सर्व उंदरी ता. चिखली, जायदा बी जुबेरखान, जुबेरखान दोन्ही रा. तोंडापूर (जामनेर) यांच्या सह नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.