विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ठरल्याप्रमाणे हुंड्याचे पैसे दिले नाहीत, म्हणून विवाहितेचा छळ करून तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी श्रीरामपुर शहरातील मोरगे वस्ती भागातील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Loading...
याप्रकरणी शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मोरगे वस्तीवर राहात असलेल्या नेहा मनोज गायकवाड हीचा तीचा नवरा मनोज वसंत गायकवाड, सासू उषा वसंत गायकवाड, सासरे वसंत शामराव गायकवाड, दीर अमोल वसंत गायकवाड यांच्यासह दोन नणंदांनी वेळोवेळी छळ केला. 

तीला घराबाहेर काढले व तीस आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भरत चिमाजी जाधव (रा. पिंपरी राजा, जिल्हा औरंगाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भां.दं.वि. कलम ४९८ (अ), ३०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.