पोलिस पाटील भरती प्रक्रिया रद्द.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कर्जत आणि जामखेड या दोन तालुक्यातील एकूण ५३ गावातील पोलिस पाटील रिक्त पदे भरण्यासाठी तहसील कार्यालय कर्जत येथे दिनांक १९ सप्टेबर रोजी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु राज्य निवडणूक आयोगाने नगर जिल्ह्यातील दि. २७ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर या कालावधीत ग्रामपंचायत निवडणूका घेण्यात येणार असल्यामुळे आचार संहिता लागू झालेली आहे. 


Loading...
निवडणूक निकाल जाहीर होईपर्यत ती अस्तित्वात राहणार आहे. त्यामुळे पोलिस पाटील भरती आरक्षण सोडतीचे कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम समाप्त होताच पोलिस पाटील आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुन्हा घेण्यात येणार आहे, असे उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांनी सांगितले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.