मनपा मतदान बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सार्वत्रिक निवडणुकांत मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन संदर्भात संभ्रम कायम असताना येत्या महापालिकेची निवडणूक ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी जालिंदर चोभे मास्तर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक आमरण उपोषण सुरू केले आहे. 

Loading...

अनेक राज्यातील निवडणुकीत ईव्हीएम मशीनचे घोटाळे उघडकीस आले आहे. या महापालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीनद्वारे मतांची चोरी होऊन नागरिकांच्या मुलभूत हक्कांवर गदा येण्याची शक्यता आहे. ईव्हीएम मशीन बाबत गॅरंटी वॉरंटी नसते, निवडणुकीनंतर एक महिन्यातच सर्व मशीन भंगारात काढल्या जातात आदि विषयांना हात घालत चोभे मास्तर यांनी ईव्हीएम मशीन बाबत प्रश्­नचिन्ह उपस्थित केला आहे. 

प्रत्येक प्रभागात मतदान केंद्रावर ईव्हीएम बरोबर व्ही.व्ही. पॅट जोडणे बंधनकारक करावे आणि प्रत्येक मतदाराला मत पडताळणीचा अधिकार मिळण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणी त्यांनी केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.