'निळवंडे'तून आज पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडणार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भंडारदरा लाभक्षेत्रातील संगमनेरपर्यंतच्या प्रवराकाठावरील गावांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी गुरुवारी (२० सप्टेंबर) सकाळी ६ वाजता १४०० क्युसेकने निळवंडे धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. यावर्षी खरीप हंगामासाठी यापूर्वी एक आवर्तन देण्यात आले आहे. 


Loading...
सद्य:परिस्थितीत भंडारदरा धरणात पूर्ण क्षमतेने म्हणजे ११०३९ दलघफू पाणीसाठा आहे. निळवंडेत ६९८२ दलघफू पाणीसाठा आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गुरुवारपासून सुरू होणारे हे आवर्तन साधारणपणे ५ ते ६ दिवस सुरू राहणार आहे. या आवर्तनात अंदाजे ५०० दलघफू पाण्याचा वापर होईल, अशी माहिती अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी बुधवारी दिली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.