श्रीरामपूरमधील तरूणाच्या मृत्यूप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर शहरालगतच्या गोंधवणी परिसरातील प्रशांत चंद्रकांत लबडे या तरूणाच्या मृत्यूप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ९ सप्टेंबर रोजी चितळी शिवारात असलेल्या कामथे यांच्या विहिरीत प्रशांतचा मृतदेह आढळून आला होता. 
Loading...

याप्रकरणी प्रशांतच्या आई मंगल चंद्रकांत लबडे (रा. भैरवनाथनगर, गोंधवणी) यांनी फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अमोल अंकुश कामथे, अभिषेक लहारे, अनिल गोराणे, रावसाहेब बडे (सर्व रा. गोंधवणी, श्रीरामपूर) यांच्याविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 


प्रशांत याला पोहता येत नाही हे माहिती असताना आरोपींनी त्याला विहिरी जवळ नेले. धिंगामस्ती करत असताना प्रशांत हा विहिरीत पडला व त्याचा त्यात मृत्यू झाला. प्रशांतच्या मृत्यूस वरील चौघे जबाबदार असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.