भाजपा सरकारच्या काळात बळीराजा वाऱ्यावर.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेतकऱ्यांना आधार देणारी एकही योजना सरकार सध्या राबवत नाही. महागाईने उच्चांक केला आहे. शेतीमालाचे भाव का वाढत नाहीत. युवकांची निराशा करणारे व बळीराजाला वाऱ्यावर सोडणारे दळभद्री सरकार घालविण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितीज घुले यांनी केले. 


Loading...
येथील एकता युवा प्रतिष्ठाणच्या वतीने आयोज़ित गणेशोत्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात घुले बोलत होते. या वेळी उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, नगरसेवक बंडू बोरुडे, चाँद मणियार, विजय बोरुडे, पप्पू चौनापुरे, विठ्ठल मंत्री उपस्थित होते. प्रास्ताविक चाँद मणियार यांनी केले. अजित चौनापुरे यांनी सूत्रसंचालन केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.