व्यावसायिकाचा श्रीगोंदे तालुक्यातील तरुणांकडून कर्ज फेडण्यासाठी खून.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- हनुमंत थोरात (खुटबाब, ता. दौंड, जि. पुणे) हे मारुती क्रॉस कारसह बेपत्ता असल्याची तक्रार ५ सप्टेंबरला यवत पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. थोरात यांच्या जेसीबीवर चालक असलेला श्रीगोंदे तालुक्यातील सूरज ऊर्फ पप्पू सुभाष ओहोळ याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पेडगाव (ता. श्रीगोंदे) येथील रावसाहेब फुलमाळी आणि बापू भोईटे यांनी मिळून थोरात यांचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. 


Loading...
पोलिसांनी राशीन येथून ओहोळ याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने तोंड उघडले. मी, माझा मित्र रावसाहेब फुलमाळी, बाप्पू भोईटे यांच्यावर कर्ज झाले होते. आम्हाला पैशांची खूप गरज होती, म्हणून आम्ही तिघांनी पैशांच्या हव्यासापोटी थोरात यांचे अपहरण करुन त्यांच्याकडून दोन लाख रुपये घेण्यासाठी हा कट रचला, अशी कबुली त्याने दिली. 

या तिघांनी ५ सप्टेंबरला थोरात यांचे वाखारी येथून कारसह अपहरण केले. त्यांच्याकडून २ लाख रुपये घेऊन त्यांचा खून केला. मृतदेह दुसऱ्या दिवशी पहाटे पाटस येथील नवा मुठा उजवा कालव्यात टाकला. त्यांची कार हडपसर मंत्री मार्केट येथे लावली, अशी माहिती त्याने दिली. ओहोळसह अन्य दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ओहोळकडून गावठी कट्टा व एक काडतूस जप्त करण्यात आले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.