आगामी दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आगामी दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे.किनारपट्टी भागात कमीदाबाचे क्षेत्र तयार होत असल्यामुळे राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक येथे १६ मिमी इतका जोरदार पाऊस पडला आहे. 

Loading...
सांगली येथे ११, जळगाव २, लोहगाव येथे ३ तर पुणे येथे ०.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर इतर भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. मराठवाड्यातील परभणी येथे ४ तर विदर्भातील अकोला येथे ८ व ब्रह्मपुरी येथे ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

राज्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान असून कमाल व किमान तापमानात चढ -उतार होत आहे. उकाड्यातही वाढ होत आहे. . राज्यात बुधवारी सर्वाधिक तापमानाची नोंद यवतमाळ येथे ३६ अंश सेल्सिअस, तर सर्वात कमी तापमानाची नोंद महाबळेश्वर येथे १५.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे.

घाटमाथ्यावर पाऊस पडत असून भिवपुरी, धारावी येथे प्रत्येकी ३, शिरगाव, अम्बोणे, दावडी, ताम्हिण येथे प्रत्येकी २ तर डुंगरवाडी येथे १ मिमी पाऊस पडला आहे. आगामी दोन दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाडयात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.