भारताने पाकला लोळवलं, 8 गडी राखून शानदार विजय


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान रंगलेल्या हाय होल्टेज सामन्यात भारतीय गोलंदाजी धडाकेबाज कामगिरी आणि रोहित शर्माची कॅप्टन इनिंगच्या बळावर भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवत शानदार विजय मिळवलाय. भारताने पाकिस्तानवर 8 गडी राखून शानदार विजय मिळवलाय.

Loading...
पाकिस्तानने पहिली बॅटिंग करून भारताला विजयासाठी 163धावांचं माफक आव्हान दिलं होतं. भारताने 162 धावांचं आव्हान सहज पार केलं. कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवनने चांगली सुरुवात करत विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. रोहित शर्माने 39 चेंडूत 6 चौकार, 3 षटकार लगावून 52 धावांची खेळी केली. 

तर शिखर धवनने रोहितला चांगली साथ देत 54 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकार लगावत 46 धावा केल्यात. अवघ्या 4 धावांनी शिखर धवनचे अर्धशतक हुकले. भारताचा स्कोअर 104 असताना शिखर आऊट झाला. दोघेही आऊट झाल्यानंतर अंबाती रायडू आणि दिनेश कार्तिकने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. दोघांनी प्रत्येकी 31 धावा करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

त्याआधी पाकिस्तानने टाॅस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय आत्मघातकी ठरला. भारताच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानाचा पार धुव्वा उडाला. पाकिस्तानचा अवघा संघ 162 धावांवर गारद झालाय. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि केदार जाधवने सर्वाधिक 3 गडी बाद करून पाकला सुरंग लावला. 

विशेष म्हणजे, जवळपास एका वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेटचा सामना पार पडला. सुरुवातीलाच भुवनेश्वर कुमारने पाकिस्तानची ओपनिंग जोडी चौथ्या ओव्हरमध्ये फोडून काढली. इमाम उल हक 2 धावा तर फखर जमान 0 धावावर बाद झाला. त्यानंतर टीम पाकिस्ताने सावध खेळी केली पण भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा सुरूच होता. 

अशाच टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे सामना अर्धवट सोडावा लागला. पाचवी ओव्हर टाकत असताना अचानक पाठीत चमक निघाल्यामुळे भर मैदानात पांड्या जमिनीवर कोसळला. डाॅक्टरांची टीम मैदानात येऊन तपासणी केली आणि त्याला स्ट्रेचरवर घेऊन गेली. 

पांड्या मैदानातून बाहेर गेल्यामुळे टीम इंडियावर याचा परिणाम झालाय. पण दुसरीकडे केदार जाधवने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर भुवनेश्वर कुमारनेही 3 गडी बाद करून पाकचा खेळ खल्लास केला. जसप्रीत बुमराने 23 धावा देऊन 2 गडी बाद केले तर कुलदीप यादवने एक गडी बाद केला. पाकिस्तानकडून बाबर आजम 47 आणि शोएब मलिकने सर्वाधिक 43 धावा केल्यात.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.