जलसंधारण मंत्र्याच्याच मतदारसंघात टॅंकरची मागणी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड तालुक्‍यात कोट्यवधी रुपयांची जलयुक्‍त शिवार योजनेची कामे होऊनही ऐन पावसाळ्यामध्ये अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणावर कामे होऊनही पाणीटंचाई निर्माण होत असताना त्यामुळे जलयुक्‍त शिवार योजनेचे पाणी नेमके कुठे मूरले? असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे.

राज्याचे जलसंधारणमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या होमग्राउंड असलेल्या नान्नज गावामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे टॅंकर आठ दिवसात सुरु करावेत, अन्यथा नान्नज ग्रामपंचायतीला टाळे टोकून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नान्नज येथील भीम आर्मी या संघटनेने नायब तहसीलदार विजय भंडारी यांच्याकडे निवदेनाव्दारे दिला आहे.
Loading...

जामखेड तालुक्‍यातील नान्नज गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठ आटल्याने गेल्या एक महिनापासून नान्नज गावाचा सार्वजनिक पाणी पुरवठा बंद झाल्याने येथील महिलांना तीन-चार किलो मीटरपर्यंत पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. ऐन पावसाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असुन, गावातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.

 नागरिकांना आपल्या शेतातील कामे सोडुन पाणी आणावे लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नान्नज गावाला आठ दिवसात पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरु करावे, अन्यथा नान्नज ग्रामपंचायतीला टाळे टोकून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नान्नज येथील भीम आर्मी या संघटनेने नायब तहसीलदारांकडे निवदेनाव्दारे दिला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.