काँग्रेसच्या आमदारावर नोटांची उधळण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून काँग्रेस पक्ष मोदी सरकारविरोधात उग्र आंदाेलने करत असतानाच मुंबईत काँग्रेसच्या एका आमदारावर गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चक्क नोटांची उधळण केल्याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला आहे. 


Loading...
त्यामुळे खान यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. चांदिवली मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री आरिफ नसीम खान सोमवारी त्यांच्या मतदारसंघातील हिमालय सार्वजनिक गणपती मंडळाच्या गणपतीच्या दर्शनाला गेले होते. त्या वेळी तेथील कार्यकर्त्यांनी खान यांच्यावर ५०० च्या नोटांची उधळण केली. 

विशेष म्हणजे हे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आहेत. नसीम खान यांच्यावरील नोटांची उधळण झाल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर खान यांच्यावर समाज माध्यमांतून टीकेची झोड उठली. विशेष म्हणजे मागच्या आठवड्यात नसीम खान यांनी देशातील वाढत्या इंधन दरासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले होते. त्यानंतर नोटांच्या उधळणीचा हा प्रकार समोर आला आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.