नगर-पुणे महामार्गावरील हॉटलात छापा टाकून अनैतिक देहव्यापार करणार्‍या चार मुलींची सुटका

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-पुणे महामार्गावरील चास शिवारात असलेल्या हॉटल मौर्य येथे पोलिसांनी छापा टाकून अनैतिक देहव्यापार करणार्‍या चार मुलींची सुटका केली. याबाबत लॉजमालक शुभम विजय कर्डिले (रा. खंडाळा, ता. नगर), व्यवस्थापक सचिन अशोक भाले (रा. जामगाव ता. वसमत जि. परभणी), तसेच दलाल सोमेन बाबलू घंटेश्वरी (रा. आडमबाग थाना, जि. हुगली, पश्चिम बंगाल) यांच्याविरुद्ध कलम 370 (3) अन्वये नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Loading...
नगर तालुका पोलिस ठाणे हद्दीतील हॉटेल मौर्यमध्ये देहव्यापार चालत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या सूचनेनुसार सोमवारी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी (नगर ग्रामीण) सागर पाटील व शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक श्रीमती पूनम पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.