आ. कर्डिले, आ. जगताप, अभिषेक कळमकर यांच्यासह ११९ जणांवर दोषारोपपत्र दाखल


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी तब्ब्ल पाच महिन्यांनंतर ११९ आरोपींच्या विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेने साेमवारी न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले आहे. 

Loading...
या गुन्ह्यात १२६ आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी १०६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. चौघांची नावे गुन्ह्यातून वगळण्यात आली असून १० जण फरार आहेत. दोषारोपपत्रात दोन विद्यमान आमदारांसह ११ आजी-माजी नगरसेवकांचा समावेश आहे.

सेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान पोलिस अधीक्षक कार्यालयात चौकशीकामी आमदार संग्राम जगताप यांना बोलाविण्यात आले असता 


त्यांची चौकशी सुरू असल्याचे समजताच तेथे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली. जमावात आमदार अरुण जगताप व कर्डिले यांच्यासह सुमारे ३०० जणांचा समावेश होता. आमदार संग्राम जगताप यांना सोडून द्या, असे म्हणत जमावाने कार्यालयावर दगडफेक केली होती.

या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात आ. शिवाजी कर्डिले, माजी आ. दादाभाऊ कळमकर, आ. अरुण जगताप, माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह सुमारे १३६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील १०६ आरोपींना अटक करण्यात आली असून, १० आरोपी फरार आहेत. तर एका आरोपीचे निधन झाले आहे. या गुन्ह्यातून ४ आरोपींना वगळण्यात आले आहे.

दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेल्यांमध्ये शरिफ राजू शेख (रा. रामवाडी),दीपक घोडेकर (रा. नालेगाव), रियाज तांबोळी (रा. हातमपुरा), दत्ता उगले (रा. भवानीनगर, मार्केटयार्ड), कुणाल घोलप (बुरुडगाव रोड), साईनाथ लोखंडे (रा. बुरुडगाव रोड), सचिन गवळी (रा. दरेवाडी), सोमनाथ गाडळकर (रा. भवानीनगर, मार्केटयार्ड), संतोष सूर्यवंशी (भवानी नगर), धर्मा करांडे (रा. मार्केटयार्ड), इम्रान शेख (रा. मुकुंदनगर), शिवाजी कर्डिले (बुऱ्हाणनगर), दादाभाऊ कळमकर (भुतकरवाडी), सचिन जगताप (रा. बनपिंप्री, ता. श्रीगोंदा), अभिषेक कळमकर (भुतकरवाडी), बाबासाहेब गाडळकर (भवानीनगर), कुमार वाकळे (सावेडी), निखिल वारे (सावेडी), प्रकाश भागानगरे (स्टेशन रोड), गजानन भांडवलकर (दरेवाडी), घनश्याम बोडखे (बुऱ्हाणनगर), सारंग अस्वर (दिल्लीगेट), मतीन सय्यद (मोमीनपुरा), सुरेश बनसोडे (बोल्हेगाव), फारूक अजिज रंगरेज (मुकुंदनगर), अफजल शेख (बुरुडगाव रोड), कुलदीप भिंगारदिवे (पाईपलाईन रोड), बबलू सूर्यवंशी (गजराज नगर, औरंगाबाद रोड), विशाल सूर्यवंशी (गजराज नगर), सुनील त्रिंबके (पाईपलाईन रोड), दत्तात्रय तापकिरे (बुऱ्हाणनगर), अंकुश चत्तर (पाईपलाईन रोड), संपत बारस्कर (सावेडी), धीरज उकिर्डे (पाईपलाईन रोड), मयूर कुलथे (गुलमोहर रोड), शुभम राजवाळ (कायनेटिक चौक), रमेश शिंदे (सारसनगर), अवधूत कासार (पाईपलाईन रोड), अलका मुंदडा (भवानीनगर), अंकुश मोहिते (सिद्धार्थनगर), अवधूत जाधव (सावेडी), संजय गाडे व धनंजय गाडे (रा. गोविंदपुरा), सय्यद ख्वाजा (झेंडीगेट), फय्याजोद्दीन शेख (रा. मुकुंदनगर), किशोर रोहोकले (रा. शिराढोण), गहिनाथ ऊर्फ दादा दरेकर (शिराढोण), विकास झरेकर (केडगाव), सागर डांगरे (रा. माळीवाडा), सागर ठोंबरे (माळीवाडा), वैभव म्हस्के (केडगाव), काशिनाथ शिंदे (वैदूवाडी), सिद्धार्थ शेलार (बुरुडगाव रोड), मयूर कटारिया (रामचंद्रखुंट), संजय दिवटे (रा. गवळीवाडा, सिव्हिल हॉस्पिटल), अरुण जगताप (भवानीनगर), जॉय लोखंडे (भवानीनगर), ओंकार गिरवले (माळीवाडा), अशोक रोकडे (रेल्वेस्टेशन), विक्रम शिंदे (निर्मलनगर), सत्यजित ढवण (ढवणवस्ती), राहुल शर्मा (माळीवाडा), किरण पिसोरे (सावेडी), राजेंद्र ससे (बेलदारगल्ली), शादाब सय्यद (फकीरवाडा), सारिका खताडे (अ. नगर), शीतल जगताप (भवानीनगर), दीपक सूळ (तोफखाना), बाबासाहेब जपकर (भिस्तबाग चौक), राहुल चिंतामणी (रा. फकिरवाडा), प्रसन्न जोशी (रा. कराचीवाला नगर), सय्यद अकबर (रा. मुकुंदनगर), आवेश शेख (रा. मुकुंदनगर), सय्यद असिफ (रा. मुकुंदनगर), सागर वाव्हळ (रा. अरणगाव रोड), संजय वाल्हेकर (रा. स्टेशन रोड), अनिल राऊत (रा. पाईपलाईन हडको), अनिकेत चव्हाण (दातरंगे मळा), गिरीष गायकवाड (रा. बागरोजा हडको),  अवी इराबत्तीन (पाईपलाईन हडको), मयूर बांगरे (स्टेशन रोड), वैभव दारूणकर (फकिरवाडा), महेश बुचुडे (स्टेशन रोड), अक्षय डाके (तोफखाना), सागर शिंदे (नगर-दौंड रोड), वैभव ढाकणे (मजले चिंचोली), संभाजी पवार (स्टेशन रोड), मंगेश ऊर्फ गुड्डु खताळ (भवानीनगर), वैभव जाधव (सावेडी) अरिफ शेख (रा. सर्जेपुरा), अरविंद शिंदे (नालेगाव), अविनाश घुले (माळीवाडा), माणिक विधाते (माळीवाडा), विपुल शेटिया (माणिकनगर), सुहास शिरसाठ (बुरुडगाव रोड), बीर दिलदारसिंग (बागडपट्टी), रेश्मा आठरे (दिल्ली गेट), रेखा जरे (सबजेल चौक), सुरेश मेहतानी (भिंगार), संदीप जाधव (केडगाव), मनीष फुलडहाळे (खिस्तगल्ली), मन्सूर सय्यद (मुकुंदनगर), चंद्रकांत औशिकर (रेल्वेस्टेशन), केरप्पा हुच्चे (माळीवाडा), चेतन चव्हाण (बुरुडगाव रोड), सय्यद अब्दुल (मुकुंदनगर), समद खान (मुकुंदनगर), वैशाली ससे (बेलदारगल्ली), भूपेंद्र परदेशी (पाईपलाईन रोड),यांचा समावेश आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.