कॉन्ट्रोव्हर्सी गर्लचे सचिन तेंडुलकरवर गंभीर आरोप !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अभिनेत्री श्री रेड्डीचं नाव अग्रणी आहे. वाद आणि श्री रेड्डी याजणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कास्टिंग काऊचच्याविरोधात भर रस्त्यात कपडे उतरवणाऱ्या श्रीने आता चक्क सचिन तेंडुलकरवर खळबळजनक आरोप केला आहे. 

Loading...
श्रीने सचिनचे दाक्षिणात्य अभिनेत्री चार्मी कौरसोबत नाव जोडले आहे. फेसबुक पोस्ट लिहिताना श्रीने लिहिले की, ‘सचिन तेंडुलकर हैदराबादमध्ये आला होता. तेव्हा तो एका ‘चार्मिग गर्ल’ला भेटला. हाय प्रोफाइल चामुडेश्वर स्वामी हे मध्यस्थ होते. एक महान व्यक्तिमत्त्व चांगला खेळ खेळू शकतात.. म्हणजे चांगला रोमान्स करु शकतात.’

श्रीच्या या पोस्टवर तिने ज्या चार्मिंग गर्लचा उल्लेख केला ती दाक्षिणात्य अभिनेत्री चार्मी कौर असल्याचे म्हटले जात आहे. श्रीच्या या स्टेटमेंटवर सचिन आणि चार्मी या दोघांनीही अजून प्रतिक्रिया दिली नाही. श्रीच्या या पोस्टचा अनेकांनीच समाचार घेतला. क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिनबद्दल असं कसं बोलू शकतेस असा प्रश्न तिला विचारण्यात आला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.