संगमनेरमध्ये विजेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द भागातील पढंरीनाथ अशोक शिंदे (वय ३०) यांना सोमवारी सकाळी विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सायंकाळी उशीरा त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले आहेत.


Loading...
याबाबत सविस्तर असे कि, सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पढंरीनाथ शिदें हे बंधारा-निमगावजाळी रस्त्यावरील शेपाळ वस्तीलगत असलेल्या शेतात विद्युत पंप सुरु करण्यासाठी गेले होते. यावेळी विहरीजवळ गेले असता त्याना विजेचा जोरदार धक्का बसला. 

दरम्यान, शिदें यांच्या पत्नीने उशीर झाल्यामुळे त्यांना फोन केला असता फोन उचलला न गेल्यामुळे पत्नी व आई या घटनास्थळी गेल्या. त्यांनी समोरील दृश्य पाहून शिंदे याना ओढण्याचा प्रयत्न केला असता आईला विजेचा धक्का लागल्याने त्या दूर फेकल्या गेल्या. यावेळी दोघींनी आरडाओरड केल्यामुळे शेजारील नागरिकांनी धाव घेत रोहित्र बंद केले. पढंरीनाथ शिंदे यांना संगमनेर येथील रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी शिंदे यांना मृत घोषित केले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.