श्रीरामपूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ससाणे यांची गेल्या ३० वर्षांची सत्ता मोडून काढण्यासाठी पालिका निवडणुकीत महायुतीची मोट बांधण्यात आली. या महायुतीत आता फुट पडू लागली असून माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी लोकसेवा विकास आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्र चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी (दि. १९) रोजी एक मेळावा आयोजित करण्यात आला असून कार्यकर्त्यांसमोर आगामी निवडणकांविषयी आपली भूमिका जाहीर करणार आहेत.


Loading...
ससाणे यांची पालिकेतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी राष्ट्रवादीचे अविनाश आदिक,माजी आमदार भानुदास मुरकुटे, भाजपचे प्रकाश चित्ते, पं.स. सभापती दीपक पटारे, अनिल कांबळे यांनी महायुतीच्या माध्यमातून अनुराधा आदिक यांच्या पाठीशी ताकद उभी केली आणि निवडून आणले. मात्र, त्यानंतर चित्ते यांचे आदिकांशी मतभेद झाल्याने ते बाहेर पडले. 

मुरकुटे गटाचे पटारे व नवले यांनी विखे यांच्याशी जवळीक साधली आहे. अनिल कांबळेही महायुतीतून बाहेर पडले आहेत. राधाकृष्ण विखे व अजित पवार यांनी ससाणे, आदिक यांना मदत करत पाठबळ दिले आहे.


अविनाश आदिक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस झाले, तर विखेंच्या पाठिंब्यावर उपनगराध्यक्ष करण ससाणे युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस झाले. आदिक यांचे मुरकुटेंशी मतभेद झाले. त्यानंतर दोघांनीही उघडपणे एकमेंकांविषयीची नाराजी व्यक्त केली. 


मुरकुटेंनी आदिकांवर राजकीय टिकास्त्र सोडत आव्हान दिले. अलिकडील काळात विखेंकडून मुरकुटे विरोधकांना पाठबळ दिले जात आहे. या माध्यमातून अशोक कारखान्याच्या निवडणुकीत मुरकुटेंना आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.


या पार्श्वभूमीवर मुरकुटे उद्या लोकसेवा विकास आघाडी माध्यमातून आपली स्वतंत्र चूल मांडत असून आयोजित केलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. यावेळी आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीविषयीची भूमिका जाहीर करणार आहे

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.