राहाता तालुक्यात आदिवासी समाजातील तरूणाचा संशयास्पद मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहाता तालुक्यातील दुर्गापूर येथील आदिवासी समाजातील एकनाथ भिमराज रजपूत (वय ३७) या मजुराचा संशयास्पद मृतदेह आढळला. त्याचा मृत्यू नेमके कशाने झाला की, घातपात करण्यात आला, याची चौकशीची मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे. 
Loading...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहाता तालुक्यातील दुर्गापूर परिसरात बिरोबा मंदिराजवळ एकनाथ भिमराज रजपूत (वय ३७) शुक्रवार दि. १४ सप्टेंबर रोजी हा काही व्यक्ती बरोबर कामासाठी बाहेर गेला होता. एकनाथ याला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रूग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी एकनाथ मयत झाला असल्याचे सांगितले. 


यानंतर एकनाथच्या मृत्यूची चौकशी करण्यासंदर्भात तक्रार अर्ज लोणी पोलीस ठाण्यात दाखल केला. दुर्गापुर परिसरात मात्र अवैध वाळु उपशाचा एकनाथ हा बळी ठरला असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू असुन घटनेला तीन दिवस उलटूनही पोलिस मात्र त्या दृष्टीने तपास करण्यास दिरंगाई करत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.