श्रीगोंद्यात ट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- तालुक्यातील भावडी गावच्या शेजारी असलेल्या वीटभट्टी जवळ दि. २५ रोजी रात्री ट्रकच्या अपघातात पोपट गणपत काळदाते, रा.चिंचोली काळदात ता.कर्जत या इसमाचा मृत्यू झाला आहे. सदर अपघाताबाबत भाऊसाहेब किसन काळदाते यांच्या फिर्यादीवरून एमएच १२ टीएल टी २८६२ या ट्रकच्या चालकावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Loading...

यााबाबत सविस्तर असे की,दि.१५ सप्टेंबर रोजी रात्री ११:४५ वाजता, श्रीगोंदा तालुक्यातील भावडी या गावच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीटभट्टी जवळ फिर्यादी भाऊसाहेब किसन काळदाते यांचे मावसभाऊ त्यांच्या टेम्पो पुढील चाकाखाली आवाज का येतो हे पाहत होते. यावेळी सिमेंट वाहतूक करणारा ट्रक एम.एच.१२ टी.एल. टी.२८६२ वरील चालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने वाहन चालवत पोपट गणपत काळदाते यांना धडक दिली. त्यामुळे या अपघातात काळदाते यांचा मृत्यू झाला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.