राज्यात सर्वत्र भरपूर पाऊस पडू दे आ. थोरात यांची गणेशचरणी प्रार्थना


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- यावर्षी राज्यात खूप कमी पाऊस झाला आहे. पावसाअभावी पिके जळून चालली असून यावर्षी गणेश कृपेने राज्यभर सर्वत्र भरपूर पाऊस पडून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक सुखी व्हावा अशी प्रार्थना राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 
Loading...

गणेश उत्सवाच्या निमित्ताने संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह. साखर कारखान्यावर माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. याप्रसंगी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, ज्ञानदेव वाफारे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, कार्याध्यक्ष बाबासाहेब वर्पे, बाळासाहेब मोरे, श्री.मुटकुळे यांसह गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 


यावेळी आ.थोरात म्हणाले कि, गणपती हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत असून मोठ्या आनंदाने संपुर्ण राज्यात हा गणेश उत्सव साजरा होतो. सर्वजण भेदभाव विसरुन एकत्र येतात. सांस्कृतिक व वैचारिक मंथन होते. विविध ठिकाणी दर्जेदार कार्यक्रमांमुळे हा उत्सव सर्वांसाठी सदैव आनंददायी ठरतो. यावर्षी मात्र कमी पावसामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेर भाग हा प्रर्जन्यछायेच्या प्रदेशात असल्याने कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.