भगवानगडसह ३५ गावांसाठी राष्ट्रीय पेयजलमधून ९२ कोटी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी श्रीक्षेत्र भगवानगडासह पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील ३५ गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेमधून ९२ कोटींचा निधी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने मिळाल्याबद्दल मंत्री मुंडे व पाणी व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांचा सत्कार पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार मोनिका राजळे उपस्थित होत्या. तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्यातील या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वर्षानुवर्षे टँकरवर अवलंबून रहावे लागत होते. डोक्यावरील हंडा कधी उतरेल याची वाट महिला पहात होत्या. कायमस्वरुपी पिण्याचे पाणी मिळावे अशी अनेक गावांची मागणी होती. 

Loading...

येळीचे सरपंच संजय बडे यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदा या योजनेसाठी येळी येथील भगवानबाबा कॉलेजमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. आमदार राजळे यांनी या योजनेसाठी शासन पातळीवर पाठपुरावा केला. वर्षभरातच शासनाकडून भरीव निधी मिळाल्याने ग्रामस्थ समाधानी झाले. 


योजनेत समाविष्ट गावातील सरपंच, पंचायत समिती सदस्य, भाजप पदाधिकारी यांनी मंत्री मुंडे व लोणीकर यांचा सत्कार केला. मंंत्री मुंडे यांच्या रॉयल स्टोन या शासकीय निवासस्थानी झालेल्या सत्कारात बोलताना त्या म्हणाल्या, भगवानगड परिसरासाठी निधी देणे हे माझे कर्तव्य समजते. 


विकासकामासाठी सर्वाधिक निधी पाथर्डी व शेवगाव तालुक्यासाठी उपलब्ध करुन दिला आहे. या भागावर गोपीनाथ मुंडे यांचे प्रेम होते. माझेही तितकेच प्रेम आहे. हल्ली कोणी कोणाचे अभार मानायला तयार नाहीत. मात्र, पाथर्डी- शेवगावची माणसे चांगली आहेत. तुम्ही माझे अाभार मानायला आलात.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.