गडाख चांगल्या चाललेल्या कामात अडथळा निर्माण करत आहेत.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  ज्ञानेश्वर कारखाना यशस्वी चालविणाऱ्या माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या विषयी मला आस्था आहे. त्यांची मला भक्कम साथ आहे. ही कामधेनू टिकवायची असेल, तर खऱ्याला खरे अन् खोट्याला खोटे म्हणावे लागेल. अन्यथा विरोधकांच्या वक्र दृष्टीने कारखाना टिकणार नाही, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले.
Loading...


ज्ञानेश्वर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत आमदार मुरकुटे बोलत होते. ते म्हणाले, कारखान्याला स्वर्गीय घुले पाटलांचे नाव देण्याला माझा पाठिंबा आहे. ज्ञानेश्वर साखर कारखाना शेतकऱ्यांची कामधेनू व कल्पवृक्ष आहे. माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, की केंद्र व राज्यातील आवास योजना, घरकुल अशी कामे पंचायत समितीमार्फत चालू आहेत.


पण हे म्हणतात अमच्यामुळेच झाली. ज्ञानेश्वर कारखाना हा अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू असून कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय झाला नाही. ऊसउत्पादकाना चांगला भाव कारखान्याने दिला आहे; परंतु गडाख हे चांगल्या चाललेल्या कामात अडथळा निर्माण करत आहेत. भविष्यातही शेखर भाऊंचा आम्हाला आधार राहणार असणार आहे, याची आम्हाला खात्री आहे, असे आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले. 


वरच्या भागात रोटेशनच्या काळात जेसीबीने कालवे फोडले जातात. टेलला पाणी मिळत नाही. हा खोडसाळपना आहे. त्याविषयी सर्वांनी एकत्र येऊन भूमिका घेणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वर कारखान्याचे २०० रुपये पेमेंट वर्ग केल्यावर विरोधक म्हणतात, आमच्यामुळे झाले. घुले आणि गडाख यांच्यातील राजकारणच मला समजले नाही. 


त्यांच्या आंदोलनासाठी घुले थांबले होते काय? ज्ञानेश्वरच्या भावावर गडाख आंदोलन करतात, टिका करतात. तुम्हाला वाहतूक नाही. कार्यक्षेत्रातच ऊस जास्त आहे. ज्ञानेश्वरच्या कारभाराकडे बोट दाखविण्यापेक्षा तुम्ही ५०० रुपयांनी पेमेंट का देत नाही? असा सवाल त्यांनी गडाखांना करून मी शेतकरी व कष्टकऱ्यांच्या बाजुने आहे, माझे काही चुकत असेल, तर मला जाब विचारा, असेही आ. मुरकुटे म्हणाले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.