घुले-मुरकुटे यांची युती झाल्यापासून कार्यक्षेत्रातील शेतकरी अडचणीत.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  'ज्ञानेश्वर'च्या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने घुले- मुरकुटे यांची छुपी युती पुन्हा एकदा उजेडात आली आहे. माझ्यावर कितीही वैयक्तिक टीका झाली, तरी ती झेलण्यास मी समर्थ आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी कुणासमोरही झुकणारा नाही. माझा लढा एवढ्यावरच थांबणार नसल्याचा इशारा माजी आमदार शंकरराव गडाख यांनी दिला.
Loading...

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखार कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत गडाखांवर झालेल्या आरोपांनंतर पत्रकार परिषदेत गडाख म्हणाले, ज्ञानेश्वर कारखान्याच्या सभेत ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी फक्त गडाखविरोधी सूर आळवला गेला. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी ज्ञानेश्वर कारखाना चांगला व उत्तम असल्याचे सांगून शेतकऱ्यांचे प्रश्न वाऱ्यावर सोडत राजकारण केले. .


घुले-मुरकुटे यांची युती झाल्यापासून कार्यक्षेत्रातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. १० वर्षांपासून घुले मुरकुटेंना सांभाळतात व कमी भाव देऊन ऊस उत्पादकांना वाऱ्यावर सोडतात. कारखान्याच्या निवडणुका जवळ आल्या, की तात्पुरता विरोध करायचा, 'तू मारल्यासारखे कर, मी लागल्यासारखे करतो' असा सावळा गोंधळ घालून खोटी सहानभूती मिळवत शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम हे दोघे करतात. 


'ज्ञानेश्वर'च्या कार्यक्षेत्रातील शेतकरी मला भेटले. त्यांनी यावर आवाज उठवा असे मला सांगितले, म्हणून भावासंदर्भात आवाज उठविल्यामुळेच कारखाना प्रशासनाला भाव द्यावा लागल्याचा ठाम दावा त्यांनी केला. ऊसउत्पादक मोठ्या अडचणीत असताना आमदार मुरकुटे यांनी 'ज्ञानेश्वर'चा कारभार योग्य असल्याचे सर्टिफिकेट दिले. हे कितपत योग्य आहे?

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.