थकीत कर्जदारांच्या नावाचा मोठा फ्लेक्स बसस्थानकात लावणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अकोले अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या काही बड्या कर्जदारांनी ऐपत असूनही थकीत चुकते केलेले नाही. यात काही सरपंच व मोठे बागायतदार आहेत. संस्थापक संचालक रमेश धुमाळ यांच्या मागणीनुसार वसुलीसाठी कटू निर्णय घेतले पाहिजेत. थकीत कर्जदारांच्या नावाचा मोठा फ्लेक्स बसस्थानकात लावणे गैर नाही. 


Loading...
थकबाकीदारांवर कारवाई केल्याने ५०० एकर जमीन संस्थेच्या मालकीची झाली. लिलावासाठी अन्य तालुक्यातील धनकोंना पाचारण करावे, असे आवाहन ज्येष्ठ संचालक सीताराम गायकर यांनी रविवारी केले. जिल्हा बँक सभागृहात झालेल्या पतसंस्थेच्या ३१ व्या वार्षिक सभेत गायकर बोलत होते. अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भोर होते. दुसऱ्या विषयानंतर अवघ्या तीन मिनिटांत सर्व विषय एकमताने मंजूर झाले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.