सुजीत झावरे पाटलांच्या मदतीला आमदार विजय औटी धावले!अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी आमदारकी लढविण्याची इच्छा व्यक्त करताच, पुढील धोका लक्षात घेऊन त्यांना सभापती पदावरून हटविण्याच्या हालचालीना वेग आला आहे. विशेष म्हणजे सुजीत झावरेंनी यासाठी विरोधक असलेल्या आमदार विजय औटी यांची मदत घेतली आहे.
Loading...

सुजीत झावरे समर्थक 9 आणि आमदार औटी समर्थक पाच अशा चौदा संचालकांनी प्रशांत गायकवाड यांच्या विरोधात आज अविश्वास ठराव दाखल केला आहे.सभापती पदावर असताना गायकवाड यांनी चांगले काम केल्याच्या प्रतिक्रीया लोकांनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे या घडामोडींचा गायकवाड यांना सहानुभूती तर औटी व झावरेंच्या आघाडीवर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे.

आमदारकी फक्त पाटलांकडेच !तालुक्याची आमदारकी औटी व झावरे यांना सोडून दुसऱ्याच्या घरात जाऊ द्यायची नाही. त्यासाठी गायकवाड, लंके, कोरडे इ. कोणी डोके वर काढू लागले तर पाटील एकत्र येणार अशी चर्चा तालुक्यातील राजकीय वर्तुळात गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी त्याचे उत्तम उदाहरण आहे असे बोलले जात आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.