कोपरगाव शहराचे वाटोळे कोल्हेंच्या कार्यकर्त्यांनीच केले !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव शहराचे सर्वांगीण वाटोळे कोल्हेंच्या प्रमुख कार्यकर्त्यांनीच केले. जनतेचा पैसा खिशात घातला, त्यावेळी कोल्हे परिवार ही लूट मूग गिळून पहात होते. आता आमदार स्नेहलता कोल्हेंना कंठ फुटून शहर विकासाचा पुळका आला आहे. त्यावेळची अपुरी, निकृष्ट कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी मीच पार पाडणार आहे. ठेकेदारांची लूट कोण करतो हे जनता जाणून आहे. दोन वर्षे पूर्ण व्हायच्या आत माझ्याकडून अपेक्षा पूर्ण होत नाही अशी बोंब कुणी मारू नये. क्रीडा संकुल कुणी पळवले हे स्वतःलाच विचारा, अशी टीका नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी रविवारी पत्रकाद्वारे केली. 


Loading...
आमदार कोल्हे यांनी मुख्याधिकारी व भाजप नगरसेवकांसमवेत शहर विकासाच्या आढावा बैठकीत वहाडणे यांच्यावर तोंडसुख घेतले होते. त्याचा वहाडणे यांनी खरपूस समाचार घेतला. पत्रकात म्हटले आहे, आठ वर्षांपूर्वी वर्कऑर्डर दिलेले १ कोटी ३१ लाखांचे कत्तलखान्याचे काम आजपर्यंत पूर्ण झालेले नाही.

दहा वर्षांपूर्वी वर्क ऑर्डर दिलेले स्विमिंग टॅन्कचे १ कोटी ३१ लाखांचे काम पूर्ण झालेले नाही, गुरुद्वारा रोड, बँक रोड, सावरकर चौक ते श्री. गो. विद्यालय रोड, डॉ. आचारी हॉस्पिटलसमोरील रोड मोहिनीराजनगर रोड अशा अनेक कामांचे वाटोळे कोल्हेंच्याच प्रमुख कार्यकर्त्यांनीच केले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.