श्रीपाद छिंदमचे मनपा निवडणूक लढविण्याचे संकेत.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या श्रीपाद छिंदमने आता मनपा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत.माझे भांडण हे जनतेच्या कामांसाठीच होते. सेनेने त्याचा विपर्यास केला. आता लवकरच निवडणुकीच्या माध्यमातून जनता न्यायनिवडा करणार आहे. मी केलेले विकास कामे घेऊन जनते समोर जाणार आहे, आता जनताच ठरवेल कोण दोषी, कोण निर्दोष आहे, असेही छिंदमने म्हटले आहे.
Loading...

नगर शहराच्या विकासासाठी भरीव निधी मिळावा यासाठी उपमहापौर पदाची जवाबदारी स्वीकारल्यापासून प्रयत्नशील होतो. शासनाकडे शहर विकासासाठी १० कोटींच्या निधीचा प्रस्ताव व कामे सुचवून पाठपुरावा केला होता. याला यश आले असून १० कोटी रुपयांचा निधी शासनाने वितरीत केला आहे, असे वादग्रस्त श्रीपाद छिंदमने एका पत्रकात म्हटले आहे.

सत्ताधारी सेनेला मनपात राजकारणाशिवाय काहीच करता आले नाही. कार्यकाळ संपायची वेळ आली, तरी शहर विकासासाठी महापौरांना एक छदामही आणता आला नाही, ही शोकांतिका आहे. या निधीसाठी मी पाठपुरावा करत होतो, त्यातही सत्ताधाऱ्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा डाव हाणून पाडत हा निधी मंजूर झाला.

या निधीतून शहरात ही मोठी विकासकामे लवकरच मार्गी लागणार आहेत. मी पहिला उपमहापौर आहे, ज्याने शहराच्या विकासासाठी प्रथमच एवढा मोठा विकास निधी मिळवला. आज पर्यंत झालेले उपमहापौर हे केवळ रबरी शिक्के म्हणून काम करणारे ठरले, अशी टिकाही छिंदमने केली. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.