श्रीरामपूरमध्ये पतीने केले पत्नीचे अपहरण; गुन्हा दाखल


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे वडिलांकडे राहात असलेल्या विवाहितेचे तिच्या पतीनेच अपहरण केल्याची घटना काल सकाळी घडली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की रेणुका अंकुश दळे हीचे सासर नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील आहे. चार वर्षांपासून आई-वडिलांकडेच राहाते. याप्रकरणी पती- पत्नीत कोर्टात वाददेखील सुरू आहे. Loading...
काल सकाळी १० वाजता पती अंकुश रामराव दळे, तीचा भाया चंद्रकांत रामराव दळे, सासरा पांडुरंग सदाशिव दाते, जगन्नाथ महादेव दाते, विजय रामदास शेलार व इतर दोन अनोळखी लोकांनी रेणुका हीस मारहाण करून बळजबरीने नांदवायला घेऊन जायचे म्हणून गाडीत बसवले व रेणुका हीच्या आई-वडिलांना मारहाण करून शिवीगाळ केली आणि बळजबरीने घेऊन गेले.

याप्रकरणी रेणुका हीचे वडील सोन्याबापू रामचंद्र दुधाळे (वय ६४, रा. भोकर, ता. श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अपहरण व मारहाण, शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अंकूश दळे, चंद्रकांत दळे, जगन्नाथ दाते, विजय शेलार यांना अटक करण्यात आली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.