श्रीगोंद्यात वाळूतस्करांचा प्रांताधिकारी गोविंद दाणेज यांच्यावर हल्ला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री शिवारात वाळूतस्करांवर कारवाईसाठी गेलेले प्रांताधिकारी गोविंद दाणेज़ यांना वाळूतस्करांनी जबर मारहाण करून त्यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या. ही घटना आज दि.१६ रोजी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. 

या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती समजताच श्रीगोंदा पोलीस निरीक्षक व तहसीलदार रात्री घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबतची माहिती अशी की, आज दि. १६ रोजी चवरसांगवी परिसरात सीनाधरण पात्रात यांत्रिक बोटीने अवैध वाळूउपसा होत असल्याची माहिती प्रांताधिकारी गोविंद दाणेज़ यांना मिळाली. Loading...
त्यानुसार प्रांताधिकारी ते तेथे गेले असता, त्यांना काही आढळून आले नाही. यामुळे ते परत निघाले असता बनपिंप्री गावानजीक वाळू वाहतूक करणारे एक वाहन त्यांना दिसले. त्यांनी या वाहनाचा पाठलाग केला असता, काही अंतरावर वाळूचे वाहन बंद पडले.

या वेळी तेथे काही वाळूतस्करांनी येऊन प्रांताधिकारी दाणेज़ यांच्या वाहनाला दुचाकी आडवी लावून त्यांच्यावर हल्ला केला तसेच गाडीच्या काचा फोडून वाहनचालकालाही जबर मारहाण केली. याबाबत रात्री उशिरा श्रीगोंदा पोलिसांना व तहसीलदारांना माहिती समजल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले होते. .


वाळूतस्करांवर कारवाई करण्यासाठी जाताना पोलीस बंदोबस्त सोबत घेऊन जाणे गरजेचे असताना महसूलचे अधिकारी एकटे का कारवाईसाठी जातात, हे न उलगडणारे कोडे आहे. परंतु अशा प्रकारे महसूलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत वाळूतस्करांची मजल गेली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.