श्रीगोंदे नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  तीन महिन्यावर येऊन ठेपलेल्या श्रीगोंदे नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. मात्र प्रभाग रचना अजून जाहीर झालेली नाही. ती काही दिवसात जाहीर होण्याची शक्‍यता असून या प्रभाग रचनेकडे इच्छुक उमेदवारांसह शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
Loading...

डिसेंबर 2014 ला झालेल्या श्रीगोंदा नगरपरिषदेचे पंचवार्षिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्यापूर्वी सप्टेंबर महिन्यात प्रभाग रचना व प्रभाग आरक्षण जाहीर झाले होते. या पंचवार्षिकचा कार्यकाळ संपत आल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्या अगोदर प्रभाग रचना व आरक्षण जाहीर होईल. येणाऱ्या काही दिवसांतच नवीन प्रभाग रचना जाहीर होण्याची दाट शक्‍यता राजकीय अभ्यासकांमधून व्यक्‍त होत आहे.

आरक्षणावर इच्छुकांचे राजकीय भविष्य !
या प्रभाग रचनेत कोणाचे गड अबाधित राहतात व कोणाच्या गडास सुरुंग लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नियोजित प्रभाग रचनेचा अंदाज बांधत काही इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरुवातही केली आहे. मात्र नवीन प्रभाग व त्यातील आरक्षणावर इच्छुकांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे.

नगरसेवकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्‍यता.
2014 ला झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत श्रीगोंदा नगरपालिकेची मतदार संख्या 17 हजार इतकी होती. त्यानुसार पाच प्रभागात मिळून नगरसेवकांची एकूण संख्या 19 इतकी होती. 2019 ला होणाऱ्या निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झालेली नाही.मात्र साधारण 23 ते 24 हजार इतके मतदार या निवडणुकीत असतील. त्यानुसार मागील पंचवार्षिकच्या तुलनेने येणाऱ्या निवडणुकीत नगरसेवकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्‍यता व्यक्‍त होत आहे. मात्र प्रभाग रचनेनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.