अहमदनगर शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगर शहरातील तोफखाना परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तीला मारहाण करून, याबाबत कोणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.याबाबत तोफखाना पोलिसांनी अफसर लतिफ शेख याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Loading...
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तीन ते चार दिवसांपूर्वी आरोपी अफसर शेख याने आपल्या घरासमोर खेळाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस आपल्या घरी बोलावले व घराच्या टेरेसवर नेले. तेथे या मुलीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु पीडित मुलीने आरडा ओरडा केल्याने आरोपीची आई घटनास्थळी आली. 

त्यामुळे यावेळी मुलीची सुटका झाली. मात्र परत दुसऱ्या दिवशी संबंधित आरोपीने पीडित मुलीस परत टेरेसवर नेवून अत्याचार केला. नंतर आरोपीची आई टेरेसवर आली. तीने व आरोपीने पीडित मुलीस मारहाण केली. व जर या प्रकाराबाबत कोणास काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.