नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्था लयाला - भाजप खासदार दिलीप गांधींची कबुली !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  भाजपचे अनेक नेते वेगवेगळे वक्तव्य करून अनेक वेळेला अडचणीत सापडले आहेत. त्यातच आता या अगोदर खासदार गांधी यांनी तंबाखूचा विषय हाती घेतला होता. त्याचाही वाद देशभरामध्ये झाला होता. आता त्यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये बँकेच्या प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये मनोगत व्यक्त करताना हा विषय मांडल्यामुळे एक प्रकारे केंद्र सरकारला घरचा आहेरच दिला आहे.
Loading...

वर्षात नोटाबंदी व जीएसटी प्रणालीमुळे हिंदुस्थानची अर्थव्यवस्था गेल्या आर्थिक वर्षात मंदावली होती. अर्थातच याचा परिणाम देशातील बँकिंग व्यवसायावर झाला आहे. तसेच देशाच्या औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीला खीळ बसली आहे, असा घरचा आहेर भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री अरुण जेटली यांना दिला असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील नगर अर्बन बँक बँकेची 108 सर्वसाधारण सभा दिनांक 27 सप्टेंबर रोजी नगर येथे आयोजित करण्यात आलेले आहे. सदरची बँक भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. शेड्युल बँक असल्यामुळे याला राज्य सरकारचे कोणतेही निर्बंध नाही. गेल्या काही वर्षांपासून बँकेच्या आर्थिक व्यवहाराबाबत अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. यावेळेला बँकेला नफा तोट्याचे परिपत्रक सुद्धा पाहिल्यावर अनेक बाबी उजेडात आलेल्या आहेत.

जीएसटी व नोटाबंदीचा विषय गेल्या वर्षभरापासून देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात चालला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडून पडले आहे. मात्र भाजपा सरकारने हे सर्व दावे फोल ठरवत ही प्रणाली कशी योग्य आहे, याची अनेक वेळा उदाहरणेही दिलेली आहेत. मात्र नगरमध्ये त्याला अपवाद झाला आहे. नगर अर्बन बँकेला यावेळी सभासदांना अहवाल वाटप न करता बँकेचा सर्व अहवाल बँकेच्या वेबसाईटवर टाकला आहे. ज्याला तो पाहिजे असल्यास त्यांनी तिथून घेऊन जावा असे सांगण्यात आलेले आहे. या अहवालामध्ये बँकेचे सर्व सर्व खासदार गांधी यांनी नोटाबंदी व जशीच्या काळामध्ये तसेच रेरा कायदा यांच्या अंमलबजावणीमुळे हिंदुस्थानी अर्थव्यवस्था मंदावली होती. अर्थातच त्याचा परिणाम देशातल्या बँकिंग व्यवसायावर निश्चित झाला आहे. त्याचबरोबर देशाच्या औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीला खीळ बसली आहे त्याचा परिणाम बँकेच्या कर्ज वाढीवर झाला आहे.

पर्यायाने कर्जाच्या वसुलीवर देखील याचा परिणाम झाला आहे. तथापि बँकेने बाकीचे प्रमाण कमी करण्यात प्रयत्न केले आहे, असे खासदार गांधी यांनी म्हटले आहे. देशांमध्ये गेल्या वर्षभरापासून नोटाबंदीचा विषय चालला आहे. सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. व्यापारीवर्गाला जीएसटीचा फटका बसला आहे. त्यातच भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी जीएसटी व नोटाबंदीचा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे, असे म्हणून सरकारला घरचा आहेर दिला आहे.

याबद्दल सांगताना गांधी म्हणाले की, हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेमध्ये बँकिंग क्षेत्रातील अलीकडच्या काळातील घडामोडी बँकांमधील मोठ्या प्रमाणातील घोटाळे यामुळे अर्थव्यवस्थेच्या विकासाला अधोगती येण्याचा धोका निर्माण झाला आहे. आपल्या देशात सन 1970 मध्ये इतिहासाची क्रांती झाली 14 खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. मात्र एकूणच बँकिंग क्षेत्र पुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

आज सर्व राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये एकूण ठेवी 114 लाख कोटींच्या आहेत, तर एकूण कर्ज वितरण 86 लाख कोटींचे करण्यात आले आहेत यापैकी 43 लाख कोटी म्हणजेच 50 टक्केण कर्जवाटप मोठ्या उद्योगधंद्यांना करण्यात आले आहे, अशी कबुलीही त्यांनी दिली आहे. यापैकी 80 टक्के कर्ज थकीत आहे अशी कर्जे विविध कारणांनी माफ केली जातात आणि परिणामी सर्वच बँका थोड्या प्रमाणात अडचणीत आल्या आहेत. नागरी सहकारी बँकेला देखील हा कर्जाच्या थकबाकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे, असेही गांधी यांनी म्हटले आहे.

सन 2017-18 च्या आर्थिक वर्षात दोन महत्त्वाच्या सुधारणांमुळे हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेला ती निर्माण झाली आहे. त्या म्हणजे मुद्रिकरण 1 जुलै 2017 रोजी लागू करण्यात आलेल्या वस्तू व सेवा कर या दोन निर्णयामुळे हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेची गती मंदावली असताना त्यांनी हिंदुस्थानचा विकास दर 6.5 टक्क्यांनी घसरला आहे. 2017 अंदाजापेक्षा कमी आहे नव्याने लागू करण्यात आलेल्या वस्तू व सेवा कर व्यावसायिकांना आलेल्या निर्माण झालेल्या हा परिणाम आहे असे त्यांनी म्हटले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.