विखे आर्युवेदिक कॉलेजच्या ड्रेनेजचे मैलामिश्रित पाणी रस्त्यावर !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शहरात असलेल्या विखे आर्युवेदिक कॉलेजच्या ड्रेनेजचे घाण पाणी घरासमोर व रस्त्यावर येत असून, त्याचा बंदोबस्त करावा. अशी मागणी श्रीराम कॉलनीतील रहिवाशांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


Loading...
विखे कॉलेजचा मोठा आवारा असून तेथे शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात तसेच काहीजण वसतिगृहात राहतात. त्यांच्या ड्रेनेजचे सर्व घाण पाणी श्रीराम कॉलनीतील रहिवाशांच्या घरासमोर व रस्त्यावर येते यामुळे रहिवाशांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत असून, लहान मुळे व वृद्धांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. या दूषित पाण्याचा त्वरीत बंदोबस्त करावा अन्यथा आरोग्य विषयक समस्या वाढल्या तर त्यास संबधित जबाबदार राहतील.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.