कोळपेवाडी दरोडा प्रकरणी ६ अटकेत,३९ लाखांचा मुद्देमाल जप्त


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील दरोडा प्रकरणी मुख्य आरोपी पपड्या काळेच्या दोन मुलांसह ६ जणांना जेरबंद करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून, यामध्ये दोन सोनारांचाही समावेश आहे. 

Loading...
या आरोपींकडून १ किलो ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने व २ किलो ८४० ग्रॅम चांदी असा जवळपास ३९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, १९ ऑगस्ट रोजी कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानावर अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून सराफ शाम धाडगे यांची गोळी झाडून हत्या केली होती. तसेच लाखोंचा मुद्देमाल लुटून नेला होता. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिलीप पवार व त्यांचे पथक करीत असताना हा गुन्हा पपड्या उर्फ संजय उर्फ राहुल व्यंकटी उर्फ महादेव काळे (रा.वर्धा) याच्या टोळीने केला असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणातील आठ आरोपींना यापुर्वीच अटक करण्यात आली आहे. 

मुख्य आरोपी पपड्या काळेसह त्याची मुले व अन्य आरोपी घटना घडल्यापासून पसार झाले होते. श्री.पवार यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वर्धा व जालना येथे पपड्या काळे व त्याच्या साथीदारांसंबंधी माहिती गोळा केली. त्या माहितीद्वारे पवन पपड्या काळे (वय १९, रा. कार्ला चौक, सुदर्शनगर, वर्धा), शुभम पपड्या काळे (वय २०), किशोर कांतीलाल भोसले (वय २२, रा.हसनाबाद, ता.भोकरदन, जि.जालना) यांना ताब्यात घेतले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.