पहिले लग्न झालेले असतांनाही दूसरे लग्न करून पत्नीने फसवले; पतीची पोलिस ठाण्यात धाव


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पहिले लग्न झालेले असतांनाही दूसरे लग्न केले. यानंतर दुसऱ्या पतीला पाच तोळे सोने व रोख दीड लाखाचा चूना लावून पत्नीने पोबारा केल्याने पत्नीसह सासू, सासऱ्याविरोधात जामखेड पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गून्हा दाखल झाला आहे.
Loading...

याबाबत पती रघुनाथ आत्माराम चिकने (रा. भूम, जि. उस्मानाबाद) यांनी जामखेड पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीचा सासरा आरोपी दिलीप शेंडकर, सासू उजाबाई यांनी त्यांची मुलगी राणी हिच्याबरोबर लग्न लावून दिले. यामध्ये संपूर्ण लग्नाचा खर्च फिर्यादीने स्वतः केला होता. 


लग्नावेळी पाच तोळे सोन्याचे दागिने देखील पत्नीच्या अंगावर घातले होते. त्यानंतर फिर्यादी व पत्नीसह गावी वाकी, ता. जामखेड येथे आले. त्यावेळी त्यांनी घराच्या बांधकामासाठी साहित्य घेण्यासाठी दीड लाख रुपये बरोबर आणले होते. ते पैसे पत्नीकडे दिले होते. 

दुसऱ्या दिवशी सकाळी रघुनाथ आपल्या चूलत मावशीकडे चहा पिण्यासाठी गेला असता. राणी ही दीड लाख रुपये व पाच तोळे सोने घेऊन पोबारा केला. चौकशी केल्यानंतर राणीचे पहिले लग्न संतोष डूचे (रा. खूरदैडण, ता. जामखेड) यांच्याशी झाल्याचे समजले. याप्रकरणी पती रघुनाथ आत्माराम चिकने यांच्या फिर्यादीवरून पत्नी, सासू, सासऱ्याविरोधात फसवणूकीचा गून्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.