आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाक लढत १९ सप्टेंबर रोजी होणार


नवी दिल्ली - संयुक्त अरब अमिरात येथे १५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाक यांच्यातील हाय व्होल्टेज सामना १९ सप्टेंबर रोजी होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाने आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध गेल्या तीन वर्षांत अवघे तीन सामने खेळले आहेत. मात्र, या महिन्यात याच संघाविरुद्ध भारताची तीन वेळा गाठ पडण्याची शक्यता आहे. 

आशिया चषक स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत. या संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाक तसेच एक क्वॉलिफायर संघ म्हणजे हाँगकाँग 'अ' गटात आहे. तर 'ब' गटात श्रीलंका, बांगलादेश व अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.

Loading...

१४ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने दुबई अथवा अबुधाबीमध्ये भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरू होणार आहेत. आशिया चषकचा फॉरमॅट थोडा वेगळा आहे. स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी असून, त्याची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.