श्रीगोंदा नगरपरिषद नगराध्यक्षांवर मेहेरबान

श्रीगोंदा - नगरपरिषदेने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत मागील काही दिवसांपासून शहरातील बेकायदेशीर फ्लेक्सवर कारवाईचा बडगा उगारत. यापुढे जर शहरात कुठलेही फ्लेक्स लावायचे असतील तर त्याची रीतसर परवानगी घेऊन जाहिरात कर भरल्यानंतरच जाहिरात फलक लावायचे असे जाहीर केले आहे. 


परंतु गुरूवारी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण शहरात मोठ मोठे बोर्ड लावण्यात आले होते.परंतु नगराध्यक्षांनीच नियम धाब्यावर बसवत केवळ बोटावर मोजण्याइतपत फ्लेक्सचेच १८० रुपयांप्रमाणे ४,५०० रुपये एवढा अल्प जाहिरात कर नगरपरिषदेत भरली. 

Loading...
याबाबत श्रीगोंदा नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना विचारले असता पोटे यांनी भरपूर बोर्डची परवानगी घेतली असून त्याचे पैसे भरले आहेत असे सांगितले. त्यावर मुख्याधिकाऱ्यांना प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावण्यात आले असून, पैसे मात्र काही फ्लेक्सचेच भरल्याचे सांगितल्यानंतर तेवढे तर चालतेच असे सांगत मला नक्की आकडेवारी माहीत नाही नगरपरिषदेत चौकशी करा असे सांगत वेळ मारून नेली. 

सामान्य लोकांना तंतोतंत नियम लावणारी नगरपरिषद नगराध्यक्षांच्या बाबतीत मात्र मवाळ भूमिका घेताना दिसली. . त्यामुळे सर्वसामान्यांना एक नियम व पदाधिकाऱ्यांना वेगळा नियम का असा सवाल नागरिक करत आहेत. तसेच वाढदिवसावर लाखो रुपये खर्च करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना जाहिरात कर भरण्यात अडचण काय असाही सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.