प्रेयसी खून प्रकरणी भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षांसह तिघांविरुध्द गुन्हा


मंगळवेढा -अघोरी व्यवसायातून आलेल्या पैशाच्या कारणावरून ३५ वर्षीय प्रेयसीला विषारी औषध पाजून तिचा खून करून स्वत: विष पिले आहे, असा बनाव केल्याप्रकरणी प्रियकर द्वारकेश दिनकर सूर्यवंशी (वय ३३, रा.माने गल्ली, मंगळवेढा) व त्याची आई तथा भाजपाची जिल्हा उपाध्यक्षा शुभांगी दिनकर सूर्यवंशी तसेच सागर भुईटे (रा. इंचगाव) या तिघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला असून द्वारकेश सूर्यवंशी याला अटक करण्यात आली आहे, तर अन्य दोघेजण फरारी झाले आहेत.
Loading...

यातील मयत गीता वाघमोडे (३५) ही जिल्हाधिकारी कार्यालय आवारात शुभम झेरॉक्स सेंटरमध्ये कामास होती. आरोपी द्वारकेश सूर्यवंशी हा झेरॉक्स काढण्यासाठी तेथे येत असल्याने यांची ओळख २०१३ मध्ये होऊन ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.


 तद्नंतर ते दोघे वडदेगाव येथील शेतातील वस्तीवर राहत होते. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान फिर्यादी सुरेखा शिंदे यांचा नातू सुयोग गाडेकर याने मोबाईलवरून, गीता हिनेे विष पिले असून तिला उपचारासाठी मंगळवेढा येथे आणले असता ती उपचारापूर्वी मयत झाली आहे असे सांगितले. 

तत्पूर्वी गीता हीस अघोरी कृत्याच्या व्यवसायामधून आलेल्या पैशाच्या कारणावरून द्वारकेश सूर्यवंशी, शुभांगी सूर्यवंशी, सागर भुईटे यांनी संगनमत करून 'माझ्या मुलीस जिवे मारण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने विषारी औषध पाजून तिचा खून करून तिने स्वत: विष पिले असा बनाव रचला' असे मयताची आई सुरेखा शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.